आंब्याची फळगळ
आंब्याची फळगळ मूळची कोकणातील, आमच्या ऑफिस मधील पायलच्या डब्यात नेहमीच नवनवे पदार्थ असतात आणि त्या पदार्थांची नावेही एकदम नवीन असतात. आत्ता मार्चच्या मधल्या आठवड्यात तिने कैरीचे लोणचं आणलं होत. आम्ही म्हटलं वा ताज्या कैरीचं लोणचं दिसतय. त्यावर तीच म्हणणं होत "आम्ही टपकू कैरीचं लोणचं म्हणतो" त्यांच्या पुण्यातील घराजवळील आंब्याच्या गाळलेल्या कैऱ्यांचे लोणचं. जमिनीतील पोषण द्रव्ये, पावसाळ्यात झालेला पाऊस, कैऱ्या लागल्यानंतर आलेले, ढगाळ वातावरण, वादळ आणि ऊन या मुळे काही प्रमाणात कैऱ्या गळणे नैसर्गिक आहे. कोकणात व्यावसायिक बागांमध्ये काही रासायनिक औषधे फवारून फळगळ नियंत्रणात ठेवतात. पण नैसर्गिक ते नैसर्गिकच ना... नव्यानेच लावलेल्या साधारणतः तीन ते चार वर्षाच्या कलमी आंब्यांना पहिल्यांदाच मोहोर लागतो तेंव्हा आपणासर्वांनाच आनंद होतो . प्रत्यक्षात किती फळधारणा होणार हे मात्र मोहोर लागलेल्या फांद्यांचे किती पोषण झालंय यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळेला अशक्त फांद्यांना आलेला मोहोर नैसर्गोकरित्या गाळून जातो. ती फांदी किती वजन सहन करू शकते तेव...