मातीत हात घाला; जमेल!


कोणत्याही कामाची सुरुवात करताना प्रश्न पडणं  ही चांगली गोष्ट आहे. पण, एक आहे प्रश्न पडले की ते तिथेच सोडून न देता त्याची उत्तरं शोधली तर मनात ठरवलेल्या कामाला गती आणि दिशा मिळते.  ‘हिरवा कोपरा’च्या बाबतीतही नेमकं हेच होत आहे.  आपल्या घरात ‘हिरवा कोपरा’ची निर्मिती करताना वाचकांना अनेक प्रश्न पडतात. त्यातलेच एक वाचक मित्र गणोश रसाळ. आपल्या घरात हिरवा कोप:याची सुरुवात कशी करावी? साहित्याची जुळवाजुळव कुठून करावी? त्यासाठीचं मार्गदशन करणारं एखादं पुस्तक आहे का? त्यासाठी लागणारं प्रशिक्षण कुठे मिळेल का? असे अनेक मूलभूत प्रश्न त्यांना पडले आहेत? 
त्यांच्याप्रमाणं अनेकांनाही असे प्रश्न पडतात.

अनेकजणांनी बाजारातून कुंडय़ा, माती, रोपे विकत आणून उत्साहात ‘हिरव्या कोप:या’ची सुरुवात केली पण काही दिवसांतच त्यांचा उत्साह मावळला. माङया नाशिकच्या एका मैत्रिणीच्या गच्चीवर जवळ जवळ शंभर एक कुंडय़ा नुस्त्या पडून आहेत. प्रत्येक सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्यावर अशाच टाकून दिलेल्या अनेक कुंडय़ा दिसतात. याचं कारण म्हणजे त्या सर्व उत्साही मंडळीनी सुरु वात करताना त्यांना पडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेलं असावं.  

खरंतर घरात ‘हिरव्या कोप:या’ची सुरुवातचं मुळी स्वत:च्या मनाची तयारी करण्यापासून करावी. झाडांना खत आणि पाणी घातलं की झालं काम. झाडं पुढे आपोआप वाढतात यासारख्या गैरसमजातून स्वत:ला मुक्त करून मी रोजच्या रोज आपल्या ‘हिरव्या कोप:या’साठी थोडा वेळ देईन, कष्ट करेन आणि झाडांची जोपासना करताना मी स्वत:ही शिकत जाईन हा निर्धार करणं आवश्यक असतं. 

प्रत्येक ‘हिरवा कोपरा’ म्हणजे शहरी पर्यावरणात निर्माण केलेलं छोटेसे शेत असतं आणि या शेताची जोपासना करणारा शहरी शेतकरी, हे सूत्र लक्षात ठेवून गावाकडच्या शेतक:याला जे जे करावं लागतं, ते ते करण्याची तयारी असणं हे ‘हिरव्या कोप:या’ची सुरु वात करण्यासाठी उपयुक्त  ठरतं.

साहित्याची जुळवाजुळव करताना  सुरुवातीला थोडसं कठीण वाटतं. थोडी दमछाक होते. कारण ‘हिरव्या कोप:या’साठी आवश्यक सर्व साहित्य बाजारात मिळतंच असं नाही. कृषी सेवा केंद्र आणि नर्सरीमध्ये चांगल्या कुंडय़ा, सेंद्रिय खतं, तेल बियांच्या पेंडय़ा, सेंद्रिय कीटकनाशकं,  कोको पीट यांसारखं साहित्य सहजपणो मिळतं;  परंतु नारळाच्या शेंडय़ा, पालापाचोळा, ओलं शेण गोमूत्र यासारखं साहित्य स्वत:लाच जमवावं लागतं. पण हे साहित्य जमवणंही खूप काही अवघड नाही. कोणत्याही देवळाच्या बाहेर सकाळी लवकर गेलं तर भरपूर नारळाच्या शेंडय़ा मिळतात. आपल्या इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा आपण सहजपणो जमा करू शकतो. हे काम करत असताना आपण पर्यावरण रक्षणाचे काम करत आहोत हे लक्षात ठेवलं की या कामातली आपली भीड चेपते आणि आपल्या कामाबद्दल आपल्याला अभिमानही वाटायला लागतो. शेण आणि गोमूत्र जमवण्यासाठी आपणाला शेतक:यांशी मैत्री करावी लागते. 

शेण-गोमूत्र यासाठी दूध घालायला घरी येणा:या गवळ्याकडूनही मदत किंवा माहिती मिळू शकते.  

थोडासा शोध घेतला तर आपल्याच परिसरात आपल्या प्रमाणोच ‘हिरवा कोपरा’ फुलवणारे इतर सहकारीही भेटू शकतात.  मग ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणो साहित्याची जुळवा-जुळव आणि देवाण-घेवाण करणं सहज शक्य होतं. अशा रितीनं एकमेकांना मदत करून ‘हिरवा कोपरा’ फुलवणा:यांचे गट मुंबई, नाशिकमध्ये कार्यरत आहेत.
आज इंटरनेटवर ‘हिरवा कोपरा’ फुलवण्यासाठीची अमाप माहिती उपलब्ध आहे, मराठीत यावरची अनेक पुस्तकंही उपलब्ध आहेत. प्रत्येक ‘हिरवा कोपरा’ हा एका स्वतंत्र परिसंस्था आहे हे लक्षात घेऊन मिळालेल्या माहितीचा उपयोग प्रत्येक शहरी शेतक:यानं करावा, असं अपेक्षित आहे. ‘हिरवा कोपरा’ जोपासताना नीर, निगा आणि निरीक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे कुंडीतील मातीचं व्यवस्थापन करायचं असतं. येणा:या प्रत्येक चांगल्या-वाईट अनुभवांची नोंद ठवून स्वशिक्षणाची प्रक्रि या निरंतरतेनं चालवावी लागते. सरावानं हे सार जमू लागत तेव्हा आपण आणि आपला  ‘हिरवा कोपरा’ स्वत:साठी आणि इतर समविचारी मित्र- मैत्रिणींसाठी  एक कृषी विद्यापीठच बनतं. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in

मंदार वैद्य     

वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?