कुंड्यांची मशागत


आपल्या ‘हिरव्या कोप-या’चा स्वभाव प्रत्येक ऋतूनुसार बदलत असतो. प्रत्येक ऋतूत होणारे वातावरणातील बदल लक्षात घेऊन त्या-त्या ऋतूच्या स्वागताची तयारी करणं म्हणूनच महत्त्वाचं असतं. यावर्षी पाऊस कधी येणार, किती येणार याबाबतच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी आपणही आपल्या ‘हिरव्या कोप:या’ची तयारी करायला हवी. पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेताची नांगरणी करतात, शेतातील माती खरिपाच्या पिकासाठी तयार व्हावी म्हणून वर्षभर साठवलेले शेणखत शेतात नेऊन पसरवतात, शेतातील अनावश्यक तण वेचून बांधावर नेऊन टाकतात. आपल्यालाही आपल्या ‘हिरव्या कोप:या’ची अशीच मशागत करायची आहे आणि तीही पावसाळ्यापूर्वीच.

 कुंडय़ांची मशागत कशी करावी

1. ज्या कुंडय़ांतील वनस्पतींचं जीवनचक्र  पूर्ण झालं असेल त्या कुंडय़ा रिकाम्या कराव्यात आणि त्यातील माती एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर पसरवून किमान दोन दिवस उन्हात ठेवावी. 

2. दुस:या दिवशी सायंकाळी या पसरलेल्या मातीवर शेण आणि गोमूत्रचा किमान तीन दिवस कुजवलेला पातळ शेणकाला शिंपडावा. 

3. तिस:या दिवशी कुंडय़ांचं पुनर्भरण करण्यासाठी जुनी माती 5क् टक्के, कोकोपीट 35 टक्के आणि चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत 15 टक्के असं मिश्रण तयार करावं.  

4. कुंडय़ा भरताना खालील थरात किमान 35 टक्के चांगला वाळलेला पालापाचोळा भरावा आणि त्यावर शेण गोमूत्रचा काला पसरवावा. 

5. आपण तयार केलेलं नवीन मातीचं मिश्रण कुंडय़ांमध्ये काठोकाठ भरावं.  

6. अशा काठोकाठ भरलेल्या कुंडय़ांना भरपूर पाणी पाजावं. आठ दिवस दिवसाआड पाणी द्यावं. असं केल्यानं कुंडय़ांच्या तळाशी भरलेला पालापाचोळा कुजण्यास सुरु वात होते आणि कुंडय़ांतील माती थोडीशी खाली बसते. 

7. याच आठ दिवसांत मातीतील तण उगवून येतं.  हलक्या हातानं हे तण उपटून पुन्हा कुंडय़ाच्या वरील थरात पसरवून द्यावं. अशा रीतीनं तयार केलेल्या कुंडय़ा आपल्या ‘हिरव्या कोप:या’तील खरिपाच्या शेतीसाठी तयार होतात.     

8. ज्या कुंडय़ांतील वनस्पतींचं जीवनचक्र  पूर्ण झालेलं नाही अशा कुंडय़ांतील मातीचीही पावसापूर्वी मशागत करणं गरजेचं आहे. अशा कुंडय़ांच्या वरील थरातील किमान तीन ते चार इंच माती हलक्या हातानं काढून घ्यावी. त्यात वाळलेल्या पालापाचोळ्याचा साधारणत: एक इंचाचा थर द्यावा. तद्नंतर त्यात वर सांगितल्याप्रमाणो नवीन मातीचं मिश्रण भरावं. अशा रीतीनं नव्यानं माती भरल्यानंतर त्यावर गोमूत्र आणि शेणकाल्याचं द्रावण पसरवावं.  

9. ‘हिरव्या कोप:या’त पावसाळ्याचं स्वागत करताना कुंडय़ांच्या मशागतीबरोबरच नवीन लागवडीची तयारी करून ठेवावी लागते. यात टमाटा, भेंडी, वांगी, कारली, काकडी, दुधी भोपळा, पालक, मेथी यांचे बियाणो जमा करून ठेवणं हे एक महत्त्वाचं काम असतं. पहिल्या पावसाबरोबर आपल्या ‘हिरव्या कोप:या’त त्याची लागवड मग करता येते!

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य    mandarcv@samyakgreen.in
वरिल लेख लोकमत मध्ये प्रकाशित झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?