पानाफुलांची नोंद वही

शाळेत असताना आपण सर्वानीच प्रयोग वही वापरली असेल. आपली प्रयोग वही जास्तीत जास्त सुंदर दिसावी म्हणून अनेकजण खूप प्रयत्न करायचे. प्रत्येक प्रयोगाचे गृहीतक, लागणारे साहित्य, प्रयोगाची प्रक्रि या, आकृत्या, निरीक्षण, नोंदी, अनुमान, निष्कर्ष हे सर्व भरताना खूप विचार करावा लागायचा, पण प्रयोग वहीचे प्रत्येक पान लिहिताना मजा यायची. आपली प्रयोग वही ही आपली ओळख असावी इतकं सारं कौतुकानं केलं जायचं!

अशीच एखादी आपल्या हिरव्या कोप:याचीही नोंद वही करता येईल का! ही नोंद वही आपल्या शाळेतल्या प्रयोग वही सारखीच आहे. फरक फक्त एवढाच की, शाळेतल्या प्रयोग वहीला आपले शिक्षक मार्क द्यायचे, हिरव्या कोप:याच्या नोंद वहीला मात्र आपण स्वत:च मार्क देणार,  कारण आपल्या हिरव्या कोप:याचे शिक्षक आपणच आहोत.

आपल्या छोटय़ाशा बाल्कनीत हिरवा कोपरा फुलवण्यास सुरुवात केली की नवनवीन अनुभव येऊ लागतात. कधी कधी अनपेक्षितरीत्या कुंडय़ांतील झाडे बहरू लागतात, तर कधी कधी अचानक मलूल दिसू लागतात. रोजच्या रोज झाडांना पाणी घालताना, कुंडय़ांतील माती हलवताना, जैविक कीट प्रतिकारक फवारताना झाडं आपल्याशी बोलू लागतात. रोजच्या रोज असा संवाद सुरू झाला की आपला हिरवा कोपरा आपली जीवन शाळाच बनून जातो. येणा:या प्रत्येक नवीन अनुभवातून आपण शिकत जातो. अशा या निसर्गातून मिळणा:या शिक्षणाची गोडी आणखी वाढवण्यासाठी हिरव्या कोप:याची नोंद वही खूपच महत्त्वाची आहे. 

रोज हिरव्या कोप:यातल्या झाडांसोबत व्यतीत केलेल्या काही मिनिटात आपण एकाच वेळी तीन गोष्टी करत असतो. निरीक्षण, विचार आणि कृती. 

वर्षभर झाडांची देखभाल करत असताना एके दिवशी,  सुमिताच्या लक्षात आलं की कुंडय़ांतील मातीत गोगलगायी झाल्या आहेत. हे झालं तिचं निरीक्षण. मग सुमीताला प्रश्न पडला ‘असं का झालं असावं?’   मग तिच्या लक्षात आलं की ‘आपल्या सोसायटीच्या परिसरातील मातीतही गोगलगायी आहेत.  कुंडय़ांमध्ये माती भरताना आपण सोसायटीच्या आवारातीलच माती आणली होती. आता काय करायचं पण, हा झाला विचार. मग सुमीतानं ठरवून टाकलं की, ज्या कुंडय़ांत नव्यानं झाडं लावायची आहेत, त्या कुंडय़ा रिकाम्या करून त्यातील माती चाळून घ्यायला हवी. आता तिच्या डोक्यात ही विचारांची प्रक्रिया फक्त पाच ते सात मिनिटात झाली असावी.  सुमीता असं रोजच्या रोज करत असावी, पण हाच स्वसंवाद तिनं नोंदवून ठेवला तर?

पुन्हा अशी समस्या दुस:या कुणाला आली किंवा तिलाच परत जाणवली तर ती पटकन उपाय सुचवू शकेल. 
अशी वही करून पहा,  काही महिन्यांनंतर आपण रोजच्या रोज केलेल्या अफाट प्रयोगाबद्दल वाचताना आपलं आपल्यालाच हसू येतं. अभिमानही वाटतो. आपले प्रयोग सतत आपल्यासोबत राहतात, डायरीतल्या क्षणांसारखे!

आमच्या सेवा आणि  उत्पादनाबद्दल जाणून घेण्या साठी: www.samyakgreen.in

मंदार वैद्य email 
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?