मळ्याला मायेचा लळा


पुण्यात राहणा:या स्वातीताईंनी त्यांचा ‘हिरवा कोपरा’ पाहायला बोलावलं. तिस:या मजल्यावरील त्यांच्या प्रशस्त   ‘हिरव्या कोप:या’त अनेक कुंडय़ा छान रचना करून मांडलेल्या होत्या. परंतु झाडं मात्र मलूल झालेली होती. त्यांचं म्हणणं आमच्या सास:यांनी हा कुंडय़ांचा संसार मांडला. ते रोज सकाळी बराच वेळ बागकाम करायचे. सासरे गेले आणि ‘हिरव्या कोप:या’ची रया गेली. आमच्या सास:यांच्या हातात जादू होती. तेव्हा इतकी सुंदर बहरायची ही झाडं. आताही आमचा ‘हिरवा कोपरा’ पूर्वीसारखा फुलावा म्हणून मी खूप प्रयत्न करते, वेळच्यावेळी खतपाणी टाकते, पण ती बहार काही परतून येत नाही. 
तसं बघायला गेलं तर स्वातीताईंचे प्रयत्न काही कमी पडत नव्हते. पण मग असं का व्हावं?  

खरंतर आपण निर्माण केलेला ‘हिरवा कोपरा’ ही एक संपूर्ण परिसंस्था आहे हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. कुंडय़ांमधली माती, त्यातले जीवाणू, गांडुळं, पाणी, त्यात वाढणा:या वनस्पती यांसोबत आपणही याच परिसंस्थेचा घटक असतो. या परिसंस्थेला परिपूर्ण आणि स्वयंचलित बनवण्यासाठी आपल्यालाही त्यात तनामनानं सहभागी व्हावं लागतं. ‘हिरव्या कोप:या’तील प्रत्येक कुंडी आणि त्यातील प्रत्येक वनस्पती एक स्वतंत्र आणि जीवित घटक आहे हे लक्षात ठेवायला हवं. आणि त्याप्रमाणो त्या प्रत्येकाशी स्वतंत्र नातं निर्माण करायला हवं. 

आपल्या छोटय़ाशा बाळाची आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी आणि निगा आपण लावलेल्या प्रत्येक झाडाची राखावी लागते. रोज सकाळी शांत चित्तानं एकेका कुंडीचं, त्यात वाढणा:या वनस्पतींचं निरीक्षण करणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं हा स्वत:साठी तर आनंददायी अनुभव असतोच पण त्यातूनच ‘हिरव्या कोप:या’चाही हळूहळू कायापालट होताना दिसतो. नुस्तं पाणी नी खतं टाकून मूळ धरत नाही, त्यासाठी झाडांनाही मायेचं शिंपण लागतं.

झाडांशी बोलायचं तर भाषा कुठली?
1 आरोग्यदायी वातावरणात वनस्पतीची सातत्यानं वाढ होत असते. दर आठवडय़ाला किमान एक या गतीनं नवीन फुटवा येत असतो. काही पानं जुनी होऊन पिवळी पडतात. प्रत्येक कुंडीतील वनस्पतीची ही वाढीची प्रक्रि या होते आहे की नाही याचं निरीक्षण अत्यावश्यक आहे. वनस्पतींची वाढ खुंटत आहे असं लक्षात आल्यास पाण्याचं प्रमाण व सेंद्रिय खताची मात्र बदलणं गरजेचं असतं. कीटक आणि  किडींचा प्रादुर्भाव होत नाहीये ना यावरही बारीक लक्ष ठेवावं लागतं. 
2 वनस्पतीच्या बुंध्याशी तसेच मुळांपाशी हवा खेळती राहावी म्हणून कुंडीतील माती प्रत्येक आठवडय़ाला हलक्या हातानं हलवणं गरजेचं असतं. घरातलाच वापरात नसलेला एखादा चमचा त्यासाठी साधन म्हणून वापरला तरी चालतो. माती हलवताना त्यात आलेले तण आपोआप निघून जातात.
3 वनस्पतीची जसजशी वाढ होत जाते तसतसे कुंडीतील पोषणमूल्य कमी कमी होत जाते. कुंडीतल्या संजीवक मातीतील जीवाणूंची संख्या अधिकाधिक असणं वनस्पतीच्या वाढीला पूरक असतं. यासाठी कुंडीतील वरील भागात सातत्यानं जैविक काडीकच:याचा पातळ थर देत राहावा.   
4 आपल्या झाडाला खूप मिरच्या लागाव्यात, खूप वांगी लागावीत अशा अवास्तव अपेक्षा झाडांकडूनही ठेवल्या जातात. परंतु बदलते ऋतू, हवेतील आद्र्रता, तपमान या सर्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न वनस्पतींना करावा लागतो. त्या सा:यात आपल्याला त्यांना मदत करायची आहे, माया लावायची आहे, हे लक्षात ठेवायला हवं. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in

मंदार वैद्य     mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?