रोज फक्त वीस मिनिटं

हिरव्या कोप:या’बाबत मित्नमंडळींशी चर्चा करताना अनेक जण सांगतात की, करावंसं वाटतं पण ‘हिरवा कोपरा’ जोपासण्यासाठी वेळ हवा, तोच आम्हाला मिळत नाही. वेळ नाही असं कारण सांगून निराशेचा सूर लावतात.

अनेक ठिकाणी नवराबायको दोघंही नोकरी करणारे, दोघांना फुरसत नाही, मग इच्छा असूनही ‘हिरवा कोपरा’ जोपासण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, आम्ही काय करू, असा त्यांचा प्रश्न असतो. त्याच प्रश्नांची उत्तरं थोडा प्रयत्न केला तर नक्की शोधता येतील. आपल्यापैकी बहुतांश जण मॉर्निग वॉकला जातातच. पुण्यात राहणारा अनुरागही रोज मॉर्निग वॉकला जातो. जाताना छोटीशी पिशवी सोबत घेऊन जातो. परिसरातील मोठय़ा झाडांखाली जमा झालेला पालापाचोळा त्या पिशवीत भरून आणतो. महिन्यातून एकदा आणलेला पिशवीभर पालापाचोळा त्याच्या ‘हिरव्या कोप:या’साठी भरपूर होतो, आणि त्यासाठी त्याला वेगळा वेळही खर्च करावा लागत नाही. 

नाशिकमध्ये राहणा-या रश्मीनं घरी दूध घालायला येणा:या शेतकयालाच सांगून ठेवलंय, तो अधनमधनं तिला गोमूत्रही आणून देतो. अशा रीतीनं रोजच्याच कामात आणि दिनचर्येत थोडीशी कल्पकता आणली तर छोटासा हिरवा कोपरा जोपासण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, अगदी दोघेही नोकरी करत असले तरीही! जाता येता जवळच्या परिसरातूनच कुंडय़ा, सेंद्रिय खत, जैविक प्रतिकारकं खरेदी करावीत. वर्षातून एकदा आपल्या शहरात भरणा:या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी म्हणजे बागकामाच्या ब:याचशा साहित्याची खरेदी करता येते. कुंडय़ा रिकाम्या करण्यासाठी आणि पुन्हा भरण्यासाठी खूप नाही तर वर्षातल्या फक्त दोन सुटय़ाही पुरतात. आपल्या  ‘हिरव्या कोप:या’ची निगा राखण्यासाठी आठवडय़ातला एक तासही पुरतो. या एका तासात पिवळी पडलेली आणि रोगट पानं काढून टाकणं, जैविक प्रतिकारकाची फवारणी, कुंडय़ांतील माती हलवणं, त्यात सुकलेला पालापाचोळा, सेंद्रिय खत मिसळणं यांसारखी कामं करावीत. कुंडय़ांना पाणी घालणं या कामासाठी तर दिवसातले 15 ते 20 मिनिटंही खूप होतात. एवढय़ा थोडय़ा वेळातही आपल्या ‘हिरव्या कोप:या’तला पाच कुंडय़ांचा संसार छान फुलू शकतो. हे एवढं जरी सांगितलं तरी काहीजण विचारतात की, आम्हाला अधूनमधून बाहेरगावी जावं लागतं, मग झाडांची काळजी कुणी घ्यायची? चार-आठ दिवस जरी घरी नसलं तरी कुंडय़ांतील झाडं मरतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण हा प्रश्नही सहज सुटण्यासारखाच आहे. 

गावाला जाताना आपण अनेकदा घरी राहणा:यांची ‘खाण्या-पिण्याची’ सोय करून जातो तशीच सोय आपल्या कुंडय़ांसाठी करून ठेवायची.

यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उगीचच मोठय़ा कुंडय़ा खरेदी करू नयेत. बाल्कनीतील ‘हिरव्या कोप:या’साठी साधारणत: आठ ते बारा इंची प्लॅस्टिकच्या कुंडय़ा पुरेशा आहेत. कुंडय़ा भरताना त्यात फक्त लाल माती भरू नये. किमान 35 टक्के सुकलेला पालापाचोळा, 35 टक्के कोकोपीट आणि 30टक्के चांगलं कंपोस्ट भरावं.  अशा रीतीने भरलेल्या कुंडय़ा वजनानं हलक्या पण वनस्पतीसाठी आवश्यक सर्व अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असतात. बाहेरगावी जाताना एखाद्या मित्राकडे किंवा आपल्याच सोसायटीच्या वॉचमनकडे त्या सोपवाव्यात. आणि जर आपण फक्त दोन तीनच दिवसांसाठी गावी जाणार असलो तर शीतपेयाच्या दोन लिटरच्या बाटल्यांना अगदी बारीक सुईनं छिद्र पाडावं. अशा बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या कुंडय़ांमधे ठेवून द्याव्यात. ही उपाययोजना दिवाळीच्या सुटय़ांत नक्की उपयोगी पडते, कारण तेव्हा थंडी असते आणि उन्हाचा तडाखाही असतो. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य    

वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?