मातीचा कस
‘माझ्या हिरव्या कोप:यात उंदीर झाले आहेत उपाय सुचवा’ असा मेसेज व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये आला. माङया इतर मित्र-मैत्रिणींनी ‘आमच्या हिरव्या कोप:यात खूप झुरळं होतात’, ‘लाल मुंग्या फार झाल्यात’ या आशयाचे अनेक प्रश्न ङोलले आहेत. पुण्याच्या महात्मा सोसायटीत राहणा:या प्रसादच्या गच्चीवर मोठय़ा श्रमानं तयार केलेल्या भाजीपाल्याच्या मळ्यात उनी (व्हाइट ग्रब) झाली होती. आपल्या हिरव्या कोप:यातील मातीचे आरोग्य बिघडले की असे न बोलावलेले पाहुणो येणारच. आणि म्हणूनच कुंडीच्या वर असलेल्या वनस्पतींची आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी कुंडीतील मातीच्या आरोग्याची घेणंही गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या कुंडय़ातील माती संजीवक माती असणं गरजेचं आहे.
पर्यावरणाचा विचार करताना अनेक वेळा जमिनीवरील प्राणी, पक्षी, झाडे-झुडपं आणि वातावरणाचा विचार होतो. परंतु पर्यावरणामध्ये माती आणि मातीखालील किडी आणि सूक्ष्म जिवांची वैविधता अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. मातीतील कच्च्या स्वरूपातील विघटनशील जैविक पदार्थांचे यथायोग्य विघटन करून त्यातून निर्माण होणारी अन्नद्रव्ये पुरविण्याचे काम हे मातीतील जीवजंतू सातत्याने करत असतात. परंतु हवामानातील बदल आणि कच्च्या जैविक पदार्थांचे प्रमाण व्यस्त झाले तर मातीतील पर्यावरणाचा ताळमेळ बिघडतो आणि मग नको असलेले पाहुणो आपल्या हिरव्या कोप:यात येतात. अशा पाहुण्यांना मज्जाव करणं आणि आपल्या कुंडय़ांतील माती सातत्यानं संजीवक राखणं सहज शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुंडीत जो काडीकचरा आणि पालापाचोळा आपण वापरतो त्याचं प्रमाण कुंडीच्या एकूण आकारमानाच्या 3क् ते 35 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. आपल्या स्वयंपाकघरातील भाजीपाल्याच्या काडय़ा आणि सालं ही ओल्या स्वरूपात कधीच कुंडय़ांच्या मातीत टाकू नयेत. ओल्या कच:याच्या विघटनात ताबडतोबीने बुरशी वाढू लागते आणि तिचं प्रमाण नियंत्रित न झाल्यास दुर्गंधी येते आणि झुरळांना असेच चांगले घर हवे असते. खरे तर सेंद्रिय जीवनप्रणालीमध्ये अन्न वाया जाणं योग्य नाही. अगदी थोडय़ा प्रमाणात शिल्लक राहणारे शिळ्या अन्नाचे कडक उन्हात निर्जलीकरण करून मगच ते आपल्या कंपोस्ट बिनमध्ये टाकावं.
आपल्या परंपरेमध्ये गोमूत्रला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रकारच्या जंतुनाशकासह गोमूत्रत कच्च्या जैविक काडीकच:याचे विघटन करणारे जीवाणूही असतात. त्यामुळेच आपल्या हिरव्या कोप:यातील कुंडय़ांमध्ये सातत्याने गोमूत्रची मात्र देत राहणं गरजेचं आहे. आणि नको असलेल्या जीवजंतू आणि कीटक यापासून मुक्त होण्यासाठी नीम पावडर तसंच रवाळ तंबाखू आहेच. ताज्या गांडूळ खतात गांडुळाची अंडी असतात, त्याचा सातत्यानं वापर केल्यानं कुंडय़ांमध्ये गांडुळं वाढवण्यास मदत होते. हिरव्या कोप:यातील कुंडय़ांचे वनस्पती विज्ञान हे जमिनीवर वाढणा:या वनस्पतींपेक्षा थोडंसं वेगळं असतं. जमिनीवर वाढणा:या वनस्पतींचे पर्यावरण मोठं असल्यानं त्यांना पर्यावरणाचा ताळमेळ बसवण्यासाठी अधिक संधी मिळते. परंतु हिरव्या कोप:याचं, कुंडय़ांचं पर्यावरण छोटं असल्यानं जास्त संवेदनशील असतं आणि अगदी छोटासा बदलही विपरीत परिणाम करतो हे लक्षात घेऊन कुंडीतील माती जिवंत राखण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. त्यात माती सातत्याने हलवत राहणं, यथायोग्य पद्धतीनं त्यात काडीकचरा, पालापाचोळा, शेण याची भर देत राहणं गरजेचं आहे.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे

Comments
Post a Comment