मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक १

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक १

एका बाजूला सुरू असलेले शहरीकरण आणि त्यामुळे होत असलेले माती, पाणी, हवा याचे प्रदुषण आणि दुसरीकडे अधिकाधिक कृषी उत्पादनासाठी रासायनिक शेतीचा अवलंब यामुळे विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला मिळणे आज जवळ जवळ अशक्यप्राय होऊन बसले आहे. आणि म्हणूनच शहरामध्ये उपलब्ध जागेत विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला निर्माण करण्याची उद्योजकता चळवळ  जगभर सुरू आहे.   

कमीतकमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन  देऊ शकणारे शहरी सेंद्रिय शेतीचे तंत्र म्हणजे मातीविरहित कुंड्यामधील शेती. या शेतीच्या विविध पद्धती आहेत या लेखमालेत आपण याबद्दल विचार करणार आहोत. मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान जाणून घेण्यासाठी सर्व प्रथम आपणाला कुंडीतील वनस्पती विज्ञानाची (container gardening) ओळख  करून घ्यावी लागेल. (क्रमशः)

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?