हिरवा कोपरा परिचय
घरातल्या छोट्याशा बाल्कनीत किंवा घराच्या परिसरात आपल्या हौसेचा हिरवा कोपरा अंकुर धरत असतो. आपण त्याला जिवापाड जपतो, तरीही कधीतरी तो रागावतो, मलूल, निराश होतो. हा कोपरा कायम प्रसन्न, टवटवीत राहावा यासाठी आनंदाची लागवड करणारी लेखमाला आपणा पुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. मागील काही वर्षात आम्ही आमच्या शेतावर तसेच आमच्या बाल्कनीत केलेल्या शहरी सेंद्रिय शेतीच्या प्रयोतून आणि मीटर मैत्रिणींशी चर्चा करताना जे उमगलं तेते वाचनीय स्वरूपात येथे मांडले आहे. यातील बहुंतांश लेख या आधी लोकमत सखींमध्ये हिरवा कोपरा सदरात प्रकाशित झाले आहेत आणि पुस्तक रूपातही उपलब्ध आहेत. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतील आणि टीकात्मक प्रतिक्रिया आम्हाला नव्याने विचार करायला प्रेरणा देतील हा आत्मविश्वास वाटतो. आपल्या सर्व प्रतिक्रिया निःसंकोच पणे नक्की कळवाव्यात ही विनंती.. email mandarcv@samyakgreen.in या निमित्ताने आमच्या अभिनव सामाजिक उद्योजकतेचा परिचयही करून देणे अगत्याचे ठरेल. आरोग्यम धनसंपदा असे आपण मानतो. आपल्या कुटुंबाला पौष्टिक, सकस आहार मिळावा ...