घोट-घोट पाणी
कल्याणला राहणार्या अमित भेलोंडे यांनी मध्यम आणि मोठय़ा कुंड्यांमध्ये जास्वंदीची झाडं लावली आहेत. या झाडांना नक्की किती आणि कसं पाणी घालावं, असा प्रश्न त्यांनी ई-मेलवर विचारला. अनेकांना खरं तर हा प्रश्न पडतो की, झाडांना नेमकं किती आणि कधी पाणी घालावं? वनस्पती जमिनीतील अन्नद्रव्यांचे वहन, प्रकाश संश्लेषण तसंच चयापचयासाठी पाण्याचा वापर करतात. जास्तीचे पाणी वनस्पतींना हानिकारक ठरतं आणि पाणी कमी पडलं तर वनस्पतींची वाढ खुंटते. झाडांची पाण्याची गरज प्रत्येक ऋतूप्रमाणे बदलत असते. प्रत्येक ऋतूत कुंड्यांमधील वनस्पतींना योग्य प्रमाणात पाणी देण्याबरोबरच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी काही उपाययोजनाही कराव्या लागतात. त्यासाठी लक्षात ठेवायचा सोपा नियम एकच साधारणत: कुंड्यांमधील मातीच्या आकारमानाच्या ५ टक्के पाणी कुंडीत कायम असावं. कुंड्यांना पाणी देताना खूप पाणी देऊ नये. पाणी घातल्यावर कुंडीच्या तळातून अगदी थोडेसे पाणी बाहेर येईल एवढंच पाणी घालावं. पाणी देताना पाइपऐवजी हातानं पाणी घालणे कधीही चांगलं. पाइपने पाणी दिल्यास ते मातीत हळुवार मुरण्याऐवजी ते वेगानं ...