बागेतील मुंग्या
तुम्हाला आठवतंय लहान असताना काळ्या आणि लाल मुंग्या सर्रास दिसायच्या. स्वयंपाकघरातील पदार्थाना मुंग्या लागू नयेत म्हणून आई, आजी एखाद्या थाळीत पाणी भरून त्यात डबे ठेवायची. अंगणात मुंग्यांची रांग दिसली की ओळीने चालणाऱ्या मुंग्या, त्यांच्या तोंडातील पांढरी अंडी, त्यांची वारूळ यांचं निरीक्षण करण्यात अनोखी मजा होती. कधीतरी चुकून लाल मुंग्याच्या वारुळावर पाय पडला की नाचून नाचून मुंग्या झटकताना सगळे सवंगडी आपल्याला हसायचे. त्या वेळी मुंग्या असतात एवढेच माहित होते. काळ बदलला शहरी जीवन गतिमान झाले आणि "मुंग्या नको" ही मानसिकता रुजली, आणि आता तर मुंग्या म्हणजे समस्या. हीच तर आहे ह्यूमन इकॉलॉजी. माझ्या वीस बावीस वर्षांच्या कालखंडात माझं निसर्गाशी असलेलं नातं कस बदललंय याचे उत्तम उदाहरण.
आता बागेतल्या मुंग्यांकडे येऊ या. आपली बाग किंवा बाल्कनीतला हिरवा कोपरा एक परिसंस्था आहे हे मान्य केलं की बागेतील सजीव आणि अजैविक घटक यांच्या परस्परावलंबनाच्या व्यवस्थानापाची जवाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव होते. या छोट्याशा परिसंस्थेत मुंग्यांची भूमिका काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. मग तुम्हीच ठरवा मुंग्या नष्ट करायच्या की नियंत्रित.
ज्या प्रमाणे गांडूळ हा ग्रामीण शेतकऱ्यांचा मित्र आहे त्याच प्रमाणे काळ्या मुंग्या शहरी शेतकऱ्यांच्या मैत्रिणी आहेत. बागेतील परिसंस्थेत अनावश्यक शर्करायुक्त जैविक घटकांचे विघटन करण्याचे कार्य मुंग्या करतात. मुंग्यांची वसतिस्थाने, वारुळे माती भुसभुशीत करून मुळांना मोकळा श्वास मिळवून देण्यात मोठी मदत करतात. आपल्या बाल्कनीत हिरव्या कोपऱ्यात कबुतरांचा वावर नियंत्रित करण्याचे कामही मुंग्या सहजासहजी पार पडतात.
आपल्या हिरव्या कोपऱ्यातील मस्त जोमाने वाढणाऱ्या नवीन फुटव्यावर अचानक चिकट द्रव दिसू लागतो, रोज निरीक्षण केले तर या चिकट द्रवाच्या भोवती तपकिरी, किंवा काळे किंवा पांढरे डाग दिसू लागतात, मग एकदम जोमाने वाढणारा फुटवा अचानक मलूल दिसू लागतो. कधी कधी तिथेच कापसासारखे दाट कीटक दिसू लागतात. बहुंतांश रसशोषक किडींच्या माद्या अंडय़ांभोवती कापसाप्रमाणो दिसणारं शर्करायुक्त आवरण तयार करतात, आणि मग त्यातून मावा, मिलीबग सारख्या शत्रूकिडी हल्ला करतात. हे शर्करायुक्त आवरण काळ्या मुंग्यांचे आवडते खाद्य आहे. रांगेने झाडावर चढणाऱ्या काळ्या मुंग्या दिसल्यातर समजावे की आपल्या मैत्रिणी आपल्या कामाला लागल्यात.
माझे आजोबा सांगायचे की झाडाच्या बुडाशी काळ्या मुंग्या असतील तर झाडाला वाळवी लागण्याची शक्यता कमी असते कारण काळ्या मुंग्यवाळवीच्या पांढऱ्या मुंग्यांशी लढाई करतात.
उन्हाळा सुरु होताना मुंग्या आपल्यासाठी थंड जागेचा शोध सुरु करतात कुंड्या आणि कुंड्यांच्या खालची जागा मुंग्यांना थंड निवासस्थानासाठी आदर्शवत असते. लाल मुंग्या चावतात त्यामुळे त्रासदायक वाटतात. मुग्यांवर औषधे वापरून मुंग्यांचा तात्पुरता बंदोबस्त करता येईल पण मुंग्या नष्ट झाल्या तर आपल्या बागेत इतर समस्या निर्माण होतील, हे नक्की. मुंग्यांना नियंत्रित करण्यासाठी:
१) कुंड्या नियमितपणे हलवून बाल्कनी झाडून घ्यावी. असे केल्याने मुंग्या स्वतःसाठी थोडासा लांबचा निवारा शोधतील.
२) जीवामृतात गूळ आणि बेसन वापरलेले असते. जीवामृत हे काडीकचऱ्यांचे विघटन करणारे विरजण आहे कुंड्यातील मातीत पुरेसा काडी कचरा नसल्यास मुंग्या आकर्षित होतात. त्यामुळे जीवमृताचा वापर नियंत्रित करावा.
३) लाल मुंग्या नियंत्रित करण्यासाठी बाल्कनीत त्यांच्या प्रवेशाची भोक बंद करावीत किंवा पाणी ओतावे.

Comments
Post a Comment