गोमूत्र, लिंबोळी आणि राखेचा डोस


आपल्या  ‘हिरव्या कोप:या’वर किडींचा हल्ला होण्याचा धोका कायम असतो.  पानं, कळ्या, खोड कुरतडणारा, रस शोषण करणारा पांढरा काळा मावा या किडी आपल्या डोळ्यानं दिसू शकतात, परंतु आपल्या वनस्पतींवर डोळ्यांना न दिसणा:या  इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही होऊ शकतो. सेंद्रिय पद्धतीनं  ‘हिरवा कोपरा’ फुलवताना कीटकनाशकं  वापरण्यापेक्षाही किडींना प्रतिबंध करणं आणि वनस्पतींची प्रतिकारक शक्ती वाढवणं जास्त गरजेचं असतं. सेंद्रिय पद्धतीमध्ये अशी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना निसर्गात उपलब्ध साधनांचा किंवा तंत्रचा वापर करता येतो. झाडांवर कीड दिसो अथवा न दिसो,  किडींना प्रतिबंध करण्यासाठी  ‘हिरव्या कोप:या’ची निगा राखणं आणि सातत्यानं जैविक कीड प्रतिकारकांची फवारणी करत राहणं आवश्यक असतं. ही प्रतिकारकं  किडींना एकदम मारून टाकण्याऐवजी वनस्पतीवर येणा:या किडींना प्रतिबंध करणारी परिस्थिती निर्माण करतात आणि आपल्या  ‘हिरव्या कोप:या’तून पिकणारा भाजीपाला रसायन मुक्त ठेवतात.  

ही जैविक कीड प्रतिकारकं वापरणं जितकं सोपं आहे तितकंच ते बनवणंही अगदी सहज आहे. आणि म्हणूनच ते घरच्या घरीही बनवता येतात. गोमूत्र, नीमअर्क आणि राखेसारख्या जैविक कीड प्रतिकारकांमुळे आपल्या ‘हिरव्या कोप:या’वर किडींची वक्रदृष्टी पडत नाही. 

आपला  ‘हिरवा कोपरा’ हा नैसर्गिक परिसंस्थेचा भाग आहे. या परिसंस्थेत काही मित्र कीटक असतात  तर काही शत्रू कीटक असतात.  हे लक्षात घेऊन जैविक कीट नियंत्रणाची उपाय योजना करणं हे एक नित्याचं काम असतं. नियमित निरीक्षण करून आपली झाडं अधिकाधिक आरोग्यदायी राखणं गरजेचं असतं.  कोणतंही पान, कळी यावर पांढरे ठिपके किंवा चिकट द्रव दिसल्यास अशी पानं, कळ्या ताबडतोब खुडून टाकाव्यात. आपल्या वनस्पतींवर कीड दिसो अथवा न दिसो  जैविक कीडप्रतिकारकांची आठवडय़ातून किमान दोनदा फवारणी करणं गरजेचं असतं. 

झाडांना गोमूत्रची आंघोळ
वनस्पतींवरील किडीच्या प्रादुर्भावाला रोखण्याची ताकद गोमूत्रत असते. गोमूत्रचं द्रावण म्हणूनच झाडांसाठी उपयुक्त असतं. गोमूत्रचं द्रावण करताना  900 मिली पाण्यात 100 मिली गोमूत्र मिसळावं. हे गोमूत्रचं द्रावण वनस्पतींवर आठवडय़ातून एकदा फवारल्यास किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण तर येतंच, पण त्याचबरोबर गोमूत्रतील पोषक द्रव्यांमुळे वनस्पतींची पानं हिरवी आणि तजेलदारही दिसू लागतात आणि वनस्पतींची वाढही चांगली होते. जोरदार फवा:यानं प्रत्येक पानास वरून खालून नीट आंघोळ घातली जाईल अशा रीतीनं गोमूत्रच्या द्रावणाची फवारणी करावी.  

नीम अर्काची फवारणी 
निंबोणी (कडूनिंब) या वनस्पतीचा औषधी गुणधर्म आणि उपयोगाबद्दल आपल्या समाजाचं पारंपरिक ज्ञान शेकडो र्वष जुनं आहे. सेंद्रिय शेतीसाठी कडूनिंब वृक्ष एक वरदानच आहे. निंबोण्यांपासून घरच्या घरी सहजपणो तयार करता येणारा नीम अर्क झाडांसाठीच महत्त्वाचं  प्रतिकारक आहे. बाजारात कृषी सेवा केंद्रांमध्ये ते सहजपणो मिळतं. 1क्क् ग्रॅम नीम पेंड 9क्क् मिलीलिटर गरम पाण्यात रात्रभर भिजवावी. सकाळी संपूर्ण द्रावण  बारीक जाळीच्या गाळणीतून गाळून घ्यावं.  हे द्रावण नंतर पाण्यात मिसळून आपल्या वनस्पतींवर सातत्यानं फवारल्यास वनस्पतींची प्रतिकारक्षमता वाढते. ग्रामीण भागात काही शेतकरी गोमूत्र आणि नीम अर्कयाची एकत्र फवारणी करतात. अशा फवारणीनं मावा, तुडतुडे, पांढरी माशी, घाटे अळी, उंट अळी, पानं पोखरणारी अळी, पिठय़ा ढेकूण इत्यादी किडीचं प्रभावीपणो नियंत्रण करता येतं.

राखेची पुरचुंडी 
आपल्या  ‘हिरव्या कोप:या’तील  वनस्पतींवर माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास एक पारंपरिक पद्धत उपयोगी ठरते. पूर्वी अशा वनस्पतींवर राख धुराळण्याची पद्धत होती. एका कॉटनच्या पातळ कपडय़ात राख घेऊन त्याची पुरचुंडी करावी. वनस्पतीवर जिथे माव्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे एका हातानं ही पुरचुंडी बंदिस्त अवस्थेत धरून दुस:या हातानं टिचक्या मारल्यास राखेचा बारीक थर माव्यावर तयार होतो. अशा बारीक थरामुळे माव्याची वाढ खुंटून त्याचा प्रसार नियंत्रणात येतो.

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य ई-मेल: mandarcv@samyakgreen.in 
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?