प्लेंटी फाॅर ऑल
शहरी शेती, गच्चीवरची बाग या विषयांकडे सध्या खूप कुतुहलानं बघितलं जातं. हे विषय समजून घेवून त्याचा प्रयोग आपल्या घरात करणारेही अनेकजण आहेत. हा विषय किंवा प्रयोग नवीन वाटत असला तरी खरंतर तो जुनाच आहे.
आपला ‘हिरवा कोपरा’ जोपासताना आम्हाला अनेक वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये आता आम्ही काय करू हा प्रश्न सातत्यानं येतो आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून आज प्रा. श्रीपाद दाभोलकर यांची एक गोष्ट सांगायलाच हवी! या विषयाचा व्रतस्थपणानं अभ्यास करणा:या श्रीपाद दाभोलकरांनी चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वीच या हिरव्या कोप:याविषयीची मार्गदर्शक तत्त्वं सांगून ठेवली आहेत. पैशानं श्रीमंत होण्याचा मुख्य रस्ता सोडून, जीवनात स्वत:चा शोध घेता घेता निसर्ग आणि विज्ञानाशी अतूट नातं निर्माण करणारे, स्वत:च्या पायवाटा निर्माण करणारे प्रा. श्रीपाद दाभोलकर. मुळातच शिक्षण शास्त्रज्ञ असलेले प्रा. दाभोलकर चार भिंतींच्या शिक्षण व्यवस्थेत कधी रमलेच नाहीत. जवळ जवळ 25 वर्षे औपचारिक शिक्षण व्यवस्थेत प्राध्यापक म्हणून काम केल्यावर, गावोगावीच्या शेतक:यांचं जीवन अनौपचारिक शिक्षणातून कसं सुकर करता येईल, याचा शोध घ्यायला त्यांनी सरूवात केली आणि त्यातूनच शेती विषयक ज्ञान संवाद या संकल्पनेचा जन्म झाला. काळाची गरज ओळखून स्वत: शहरी सेंद्रिय शेतीचे प्रयोगही केले आणि त्यातूनच शहरी सेंद्रिय शेतीच्या विविध प्रयोगांना पाठबळ मिळालं.
मे 1997 मध्ये प्रसिद्ध पत्रकार अरु ण शौरी यांनी ‘ज्याने क्र ांती घडवून आणली’ हा लेख लिहिला होता. (मूळ लेख इंग्रजीमध्ये) त्यात प्रा. दाभोलकरांच्या शहरी शेतीचं वर्णन आहे. शौरी कोल्हापूरला एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेले होते, तेव्हा संध्याकाळी दाभोलकरांच्या घरी गेले. ते लिहितात ‘संध्याकाळी उशिरा त्या साध्याशा घरातील पाय:या चढून गेल्यावर गच्चीत डोकावताना मिळालेला सुखद धक्का अजूनही लक्षात आहे. तेथील कुंड्यातील भाजीपाला. एका बाजूला पाच फूट उंच वाढलेला मका तर दुस:या बाजूला वाढलेला ऊस. अगदी 12 इंची कुंडीतील आंब्याच्या झाडाला लागलेलं तळहातापेक्षाही मोठं आंब्याचं फळ. आणि हे सर्व पाला पाचोळ्यापासून बनवलेल्या मातीत वाढवलेले! आम्ही हे बघत असतानाच प्रा. दाभोलकर खाली वाकून माती चाळून आम्हाला त्यातील आलं, लसूण आणि बटाटे दाखवत होते’.
लहानपणापासूनच्या अनुभवातून प्रा. दाभोलकर जे शिकले आणि त्यांनी जे प्रयोग केले त्याचं विस्तृत विवेचन त्यांनी स्वत:च्या Plenty for All या पुस्तकात केलं आहे. शेती विज्ञान उलगडून दाखवताना त्यांनी अहिंसा, निसर्गोपासक जीवन प्रणालीचंही यथार्थ वर्णन केलं आहे. या पुस्तकाची सुरूवात ‘विश्वं पुष्ट ग्रामे अस्मिन अनतुरम’’ (म्हणजेच ‘विश्वाच्या विपुलतेचा आणि परिपूर्णतेचा शोध आपापल्या गावातच घेऊया’) या ऋग्वेदातील पदापासून होते. या पुस्तकात शहरी शेतीचं सार तीन मूळ संकल्पनामध्ये सामावलेलं आहे.
1) विरहस्यिकरण:
म्हणजेच निसर्गातील आणि वनस्पतींच्या वाढीतील,जे जे खूप गुंतागुंतागुंतीचे अनाकलनीय वाटतं, त्यातील वैज्ञानिक संकल्पना, वैज्ञानिक तत्व आणि माहितीचं स्वत: स्वत:च्या अनुभवातून आणि सोप्या भाषेत आकलन करून घेणं म्हणजे विरहस्यीकरण. पर्यावरण, तंत्रज्ञान तसेच आपल्याला आलेले अनुभव सातत्यानं बदलत असतात त्यामुळे विरहस्यीकरणाची प्रक्रि याही निरंतर असते.
2) स्वाध्याय
आपलं घर, परिसर आणि आपली शेती या बाबी जोपासताना सातत्यानं अभ्यास करणं म्हणजेच स्वाध्याय. स्वाध्यायात वैज्ञानिक दृष्टी, सातत्याची प्रयोगशीलता आणि विरहस्यीकरण याबाबींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या स्वाध्यायी जीवन प्रणालीत आपल्याच परिसरातील इतरांना सहभागी करून घेणं आणि ज्ञानाची देवाण घेवाण करणं महत्वाची प्रक्रि या असल्याचं प्रा. दाभोलकर नमूद करतात.
3) Natueco शेती
Natueco हा शब्द Nature आणि Ecosystem या दोन शब्दांच्या संयोगातून निर्माण झाला आहे. आपण करत असलेल्या शेतीतील प्रत्येक वनस्पतीला परिपूर्ण आणि निकोप परिसंस्था निर्माण करून देवून सौर उर्जा, वायू, माती, पाणी व अत्यावश्यक जीव जंतू यांच्या पर्यावरणीय प्रकृतीतून अन्न निर्मिती हे Natueco शेतीचं मूख्य सूत्र आहे.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्या साठी: www.smayakgreen.in
मंदार वैद्य
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे

Comments
Post a Comment