ढिगली पालापाचोळ्याची
'हिरवा कोपरा’ हे सदर वाचून अनेकांनी आपल्या घरातील ‘हिरव्या कोप:या’तही प्रयोग करणं सुरू केले आहेत. आपला हिरवा कोपरा सेंद्रीय पध्दतीनं फुलवताना अनेकांना अडचणी येत आहेत, प्रश्न पडत आहेत. किरण पाटील हे धुळ्याचे वाचक. त्यांनी आपल्या घराच्या परिसरातील पालापाचोळा-काडीकचरा एका खड्डय़ात जमा केला आहे. त्यांचा प्रश्न आहे की, खड्डय़ात जमा केलेल्या कच:याचं आपोआप सेंद्रीय खत तयार होईल का?
आपल्याकडे ग्रामीण भागात घराजवळ उकिरडय़ाचा खड्डा तयार करून त्यात शेण, काडी कचरा आणि चुलीची राख टाकून खत तयार करण्याची पारंपरिक पद्धत आहे. वर्षभर साठवलेलं शेण आणि इतर जैविक काडीकच:याचं शेणखत पावसाळ्याच्या आधी शेतात नेऊन पसरवलं जातं. परंतु खत तयार करण्याच्या या पद्धतीमध्ये अनेक तोटे असल्याचं लक्षात येतं. एकतर कम्पोस्टिंग होत असताना त्यावर पाऊस झाल्यास कम्पोस्टमधील अन्नद्रव्यं मातीत वाहून जातात, त्यामुळे शेतात टाकल्या जाणा:या सेंदी्रय खताची गुणवत्ता कमी होते. या शिवाय खड्डय़ातील शेणखतात अनेकदा उनी सापडते. त्यामुळेच हल्ली उकिरडय़ाच्या खड्डा पद्धतीमध्ये सुधारणा करून जमिनीवर ‘ढीगली’ पद्धतीचा तसेच विटांच्या पीटचा (नडेफ पद्धतीचा) वापर ग्रामीण भागात केला जातो.
किरण पाटील जर नुसताच काडीकचरा खड्डय़ात जमा करत गेलेत तर त्याचं आपोआप खत तयार होईल यात काही शंका नाही. पण ते खत तयार होण्यास किमान सहा ते आठ महिने लागतील. पुन्हा खतातील अन्नद्रव्य मातीत वाहून जाण्याची शक्यताही आहेच. शहरी वातावरणात अशा पद्धतीनं खत तयार करताना त्यातील आर्द्रता टिकवून ठेवणं, कच:याचं उधईपासून संरक्षण करणंही गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या बागेतील पालापाचोळा आणि काडीकच:यापासून खत तयार करायचं असेल तर ढीगली पद्धत ही सर्वात सोपी पद्धत आहे. फक्त तीन टप्प्यात या पध्दतीनं उत्तम प्रतीचं सेंद्रीय खत तयार होऊ शकतं.
तीन टप्प्यांची ढीगली पध्दत
सर्वप्रथम एखाद्या छोटय़ा ड्रममध्ये एक किलो शेण, एक लिटर गोमूत्र आणि 9 लिटर पाणी याचा शेणकाला तयार करावा. हा शेणकाला किमान तीन आठवडे कुजलेला असल्यास उत्तम. आपणाकडे थोडासा जास्तीचा वेळ असेल तर शेण (एक किलो), गोमूत्र (एक लिटर), गूळ (5क् ग्रॅम) आणि 9 लिटर पाण्याचे 72 तास कुजवलेलं अमृतजलही आपण तयार करू शकतो. परंतु अमृतजल तयार करताना ते दिवसातून किमान एकदा तरी हलवावं लागतं आणि ते ताबडतोबीनं वापरावं लागतं. आपल्या बागेत जमा झालेला पालापाचोळा एका ठिकाणी जमा करावा आणि त्यातील प्लॅस्टिक, काचा काढून टाकाव्यात.
आपल्या बागेतील थोडी सावलीची जागा निवडून तेथे साधारणत: चार बाय सहा फूट जमिनीवर प्लॅस्टिक अथवा ब्यानर पसरावा. बाजारात प्लॅस्टिकचे गांडूळखतासाठीचे तयार पीटही मिळतात. सर्वप्रथम एक फूट उंचीचा ढीग करावा आणि आपण तयार केलेला एक लिटर शेणकाला किंवा अमृतजल पुन्हा 9 लिटर पाण्यात मिसळून या ढिगावर नीटपणो शिंपडावं. या ढिगावर थोडंसं चालल्यास हा काडीकचरा नीट दाबला जातो. त्यानंतर पुढील एक फुटाचा ढीग रचून पुन्हा शेणकाला किंवा अमृतजल शिंपडावं.
अशा रीतीनं बागेतील सर्व पालापाचोळ्याचा ढीग तयार करावा.
आठवडय़ातून किमान दोनदा शेणकाला किंवा अमृतजलाचं शिंपण या ढिगावर करत राहावं. आणि त्यातील आर्द्रता किमान 10 टक्के राहील याची काळजी घ्यावी. तीन आठवडय़ानंतर हा ढीग हलवावा. म्हणजे खालचा पाचोळा वर, वरचा खाली न्यावा. ग्रामीण भागात यालाच पलटी मारणं म्हणतात. या पद्धतीनं किमान 9क् दिवसात चांगल्या प्रतीचं सेंद्रीय खत तयार होतं. खत तयार झाल्याचं लक्षात आल्यावर ते नीट चाळून घ्यावं. साधारणत: 1क्क् किलो पालापाचोळ्यापासून 4क् किलो खत तयार होतं.
हे सर्व करत असताना कोणत्याही परिस्थितीत ओलं शेण जसंच्या तसं वापरू नये. पालापाचोळ्याच्या ढिगातील आर्द्रता खूप जास्त होणार नाही तसेच ते एकदम कोरडंही होणार नाही याची दक्षता घ्यावी.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्या साठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य ई-मेल करा
वरिल लेख लोकमत मध्ये प्रकाशित झाला आहे
Comments
Post a Comment