शहरातल्या घरात निगुतीची शेती


मातीतून काही उगवण्याचा आनंद काय असतो हे एखाद्या शेतक:याला जावून विचारा. अपार कष्ट करून मातीतून उगवलेलं धन पाहतांना त्यांच्या चेह-यावर फक्त आनंद असतो. शेतक:याचा हा आनंद फक्त गावातच दिसतो असं नाही. शहरातही आपला ‘हिरवा कोपरा’ हौसेनं आणि कष्टानं फुलवणाराही शेतकरीच तर असतो.  कुंडीतून उगवलेल्या रोपाचा, बहरलेल्या वेलीचा आनंद शेतक:याला होणा:या आनंदासारखाच असतो.

शेती करणं असो नाहीतर ‘हिरवा कोपरा’फुलवणं असो काम करतांना अडचणी येतात, प्रश्न निर्माण होतात. 
आपण फुलवलेल्या ‘हिरव्या कोप:या’तून मिळणा:या रसायनमुक्त भाजीपाल्याचं उत्पादन नक्की मोजायचं कसं? आपल्या छोटय़ाशा बाल्कनीत करावयाच्या बागकामाचा खर्च आपल्याला कसा परवडेल? या सारखे प्रश्न अनेक मित्र-मैत्रिणी विचारता आहेत.  विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं तसेच सातत्यानं ‘हिरवा कोपरा’ जोपासणारे त्यांना मिळणा:या उत्पादनाचे आणि चवदार भाजीपाल्याचे वर्णन  करत असतात. त्यांनी हे साध्य करण्यासाठी चिकाटीनं आणि व्यवस्थितशीर प्रयत्न केलेले असतात. तरीही त्यांना पडणारे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवतांना गावाकडचा शेतकरी आणि त्याची शेती करण्याची पध्दत डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला पडलेले प्रश्न सोडवताना खूपशी मदत होईल.

गावाकडचे शेतकरी आणि आपण 
आपली छोटीशी बाल्कनी ‘हिरव्या कोप:या’च्या शहरी शेतीत बदलताना खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ साधताना गावाकडील शेतक:यांकडून शिकण्यासारखं बरंच आहे. गावाकडील शेतकरी बाजारातून काही विकत घेण्यापूर्वी अनेकदा विचार करतो. ज्या बाबी परिसरातून सहजपणो उपलब्ध होणार आहेत त्याची खरेदी तो कधीच करत नाही. त्याचप्रमाणो आपल्या ‘हिव्या कोप:यां’साठी काय काय सहजपणो उपलब्ध होऊ शकते त्याची नीटपणानं यादी केल्यास आपला बराचसा खर्च कमी होईल. गावाकडील शेतीचा आणखी एक पारंपरिक गुण म्हणजे ‘देवाण-घेवाण’.गावाकडील शेतकरी शेतीसाठी होणारा बराचसा खर्च देवाण-घेवाणीतून कमी करतात. आपणही आपला शहरातील ‘हिरवा कोपरा’ फुलवताना आपल्यासारख्या इतर मित्रमंडळींशी देवाण-घेवाण सुरू करून ‘हिरव्या कोप:या’चा खर्च कमी करू शकतो. ग्रामीण शेतक:यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण शहरातील ‘हिरव्या कोप:या’च्या शेतक:यांनी घेणं अत्यावश्यक आहे. तो गुण म्हणजे गावाकडील शेतकरी एकदा विकत घेतलेली कोणतीही गोष्ट कधीच टाकून देत नाही. आपल्याकडे शहरात मात्र कुंडय़ा, माती या सारख्या गोष्टी सरळ  टाकून दिल्या जातात आणि पुन्हा नवीन घेतल्या जातात ही सवय बदलली तर निश्चितच ‘हिव्या कोप:यां’चा खर्च कमी होईल.
 भांडवली खर्च करतांना.

‘हिव्या कोप:या’त शेती करताना कितीही काटकसर करायची म्हटली तरी किमान खर्च करावा लागतो. हा खर्च करताना आपण सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करणं गरजेचं असतं. असा पर्याय निवडताना स्वस्त, परंतु टिकाऊ गोष्टींची निवड करावी. उदा. बाजारात उपलब्ध प्लॅस्टिकच्या लाल कुंडय़ांपेक्षा काळ्या कुंडय़ा स्वस्त असतात आणि त्या जास्त टिकतातही. आपल्या गच्चीत किंवा बाल्कनीत सीमेंटचे वाफे किंवा लोखंडी स्टॅण्ड तयार करवून घेताना प्रत्येक वनस्पतीची आणि कुंडीची नीट देखभाल करता येईल अशी रचना करावी. अन्यथा संपूर्ण खर्च वाया जाण्याचा धोका असतो. 
सुरुवातीला करावयाचा हा भांडवली खर्च विचारपूर्वक आणि मर्यादित स्वरूपात केल्यास ‘हिव्या कोप:यां’ची शेती नक्कीच परवडते. 

खर्च आणि उत्पादनाचं गणित जमवताना
बाजारात उपलब्ध, विकतची सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरली तर ‘हिरव्या कोप:यां’तून चांगलं उत्पादन मिळतं हा आणखी एक गैरसमज. खरंतर कुंडीतील माती जैविक (पालापाचोळा, शेण, गोमूत्र) घटकांनी परिपूर्ण असेल तर एकूण आकारमानाच्या फक्त 5 ते 8 टक्के इतर खतांची गरज असते.  हे लक्षात घेतल्यास ‘हिरव्या कोप:या’तून यथायोग्य उत्पादन तर मिळतंच शिवाय खर्चही कमी होतो.

ब:याच वेळेस ‘हिरव्या कोप:यां’ची निगा राखण्यास हेळसांड होते. मग त्यावर वेगवेगळे रोग पडतात आणि हाती येणारं उत्पादन वाया जातं. कधी कधी रोग नियंत्रणात आणण्यासाठी माळ्याला बोलवावं लागतं. मग त्याचा आणखी जास्तीचा खर्च होतो. हे सर्व टाळायचं असल्यास पिवळी पडलेली पानं, रोगट खुडवे, मावा ‘हिरव्या कोप:यां’तून वेळच्या वेळी काढून टाकावेत.  नित्यनेमानं जैविक प्रतिकारकांची फवारणी करावी. फळभाज्या कोवळ्या असतानाच खुडाव्यात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ‘हिव्या कोप:या’साठी करत असलेला प्रत्येक खर्च नोंदवून ठेवावा. ‘हिरव्या कोप:या’ला फुलवण्यासाठी चिकाटीचे प्रयत्न करावेत आणि हळूहळू खर्च कमी करत न्यावा. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in

वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?