मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ६*
मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ६* *संजीवक कुंडी मिश्रणाचा दुसरा घटक: शेणखत* संजीवक कुंडी मिश्रणात घरी तयार केलेल्या कम्पोस्ट सोबत सर्वात सहजपणे उपलब्ध होणारं आणि स्वस्त खत म्हणजे शेण खत. पूर्णत: कुजलेल्या शेणखतात नायट्रोजन, फॉेस्फरस आणि पोटयाश असतं. पुर्णतःकुजलेले शेणखत काळे पिठाळ दिसते आणि कोरड्या स्वरूपात गंधहीन असते. पाण्याचा स्पर्श होताच शेणाचा आणि पहिल्या पावसानंतर मातीला येणा-या सुगंधा प्रमाणे सुगंध येतो. शेणखताचे कण बारिक असल्याने कुंडीतील वनस्पतींच्या मुळांना भक्कम आधार देण्यासाठी शेणखत महत्त्वाची भूमिका बजावते. शेणखत शेतकर्याकडील उकीरड्यावरून आणलेलं असलं तरी त्यात प्लॅस्टिक तसेच इतर कचरा, खडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते छोट्या चाळणीतून चाळून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत ओलं शेणखत किंवा कृत्रिमरित्या कोरडे केलेले शेणखत वापरू नये. ओलं शेणखत कुजताना उष्णता निर्माण करतं. तसंच ओल्या शेणात उनी (व्हाइट ग्रब) असते. कुंडीत उनी वाढल्यास वनस्पतींची नवीन मुळं खातात आणि वनस्पतींची वाढ खुरडत...