मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ३
मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ३
कुंडीतील वनस्पती विज्ञानाचे तत्व
कुंड्यातील वनस्पतींच्या सुयोग्य वाढीसाठी ज्या प्रमाणे कुंडीच्या बाहेरील पर्यावरण महत्त्वाचे असते त्याच प्रमाणे कुंडीच्या आतील परिसंस्था देखील समृद्ध बनवावी लागते हे आपण मागील लेखांकातून समजावून घेतले. आता कुंडीतील वनस्पती विज्ञानाची थोडी चर्चा करूया.
आरोग्यदायी जीवनमानासाठी माणसास चौरस आहाराची गरज असते त्याच प्रमाणे वनस्पतींना देखील नियमित चौरस आहाराची गरज असते.
मातीविरहित कुंड्या भरताना आपल्या कुंडीतील वनस्पतीला पुढचे किमान दोन महिने चौरस आहार मिळाला पाहिजे हे पहिले तत्व.
वनस्पतींचा हा चौरस आहार आणखी पोषक बनवण्यासाठी सुक्ष्म जीवांनी समृद्ध असला पाहिजे. हे दुसरे तत्व. वनस्पतीसाठी अशा परिपूर्ण चौरस अहारास आपण संजीवक कुंडी मिश्रण म्हणूया...
वनस्पतीच्या चौरस आहाराच्या मातीविरहित रेसीपी बद्दल आपण पुढील लेखांकातून माहिती मिळवणार आहोतच.
(क्रमशः)
मंदार वैद्य
Comments
Post a Comment