मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ४
मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ४
कुंड्यातील वनस्पतींना परिपूर्ण चौरस अहाराचे संजीवक कुंडी मिश्रण
आपल्या स्वयंपाक घरात तयार होणा-या प्रत्येक पदार्थासाठी आपल्याला वेगवेगळे साहित्य जमा करावे लागते. उदाहरणा दाखल काकडीची कोशिंबीर घेऊयात त्यासाठी काकडी, दही, दाण्याचा कुट, मोहरी, हळद, तेल, मीठ, साखर असे साहित्य लागते त्याच प्रमाणे वनस्पतीच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळया संजीवक मिश्रणाचे प्रकार (रेसीपी) तयार करावे लागतात.
या लेखांकात आपण संजीवक कुंडी मिश्रणासाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची ओळख करून घेऊया.
सर्व वनस्पतींना नायट्रोजन, पोटयॅशियम आणि फॉस्फरस या प्राथमिक अन्नद्रव्यांची गरज असते हे आपण सर्वच जण जाणतो. बहुतांश कंपोस्ट खतं याची गरज पूर्ण करतात. या शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही द्वितीय अन्नद्रव्यंही वनस्पतींच्या आरोग्यदायी वाढीसाठी गरजेची असतात. याशिवाय इतर आठ सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही वनस्पतींना अत्यल्प प्रमाणात गरज असते. सर्व प्रकारची अन्नद्रव्यं वनस्पतींना उपलब्ध व्हावीत म्हणून कोणत्याही एकाच प्रकारच्या सेंद्रिय खतावर अवलंबून न राहता विविध सेंद्रिय खतांचं मिश्रण आलटून पालटून वापरल्यास अधिक फायदा होतो. आपली कुंडी मातीविरहित आहे लक्षात ठेवून संजीवक कुंडी मिश्रण तयार करताना प्रामुख्यानं शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खतं ,गांडूळ खत ,हाडांचं खत, कोंबडी खत, तेल बियांची पेंड हे साहित्य गोळा करणे गरजेचे आहे. पुढील लेखांकातून आपण प्रत्येक साहित्याचे गुण आणि पोषण मुल्य जाणून घेणार आहोत.
आमच्या नॅनो लेखमालेतील हा चौथा लेखांक होता. पहिल्या तीन लेखांना आपण भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद. आपले प्रश्न, प्रतिक्रिया नक्की कळवा.
मंदार वैद्य
वरिल लेख हिरवा कोपरा ब्लाॅग वर पुर्वप्रकाशीत आहे
Comments
Post a Comment