मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक २
मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक २
कुंडीतील वनस्पती विज्ञान (container gardening)
बागेती जमीनीवर, शेतात, जंगलात वाढणा-या वनस्पती आंणि कुंड्या मध्ये वाढणा-या वनस्पती यांच्या एकूणच जीवनमान आणि वाढी मध्ये मुलभूत फरक असतो.
जमीनीवर वाढणा-या वनस्पतींची मुळं पाणी आणि अन्नाच्या शोधात जमीनीत मुक्त संचार करू शकतात. परंतु कुंड्यातील वनस्पतींच्या मुळांना मात्र सर्वच अन्नद्रव्य आणि पाणी मर्यादित जागेतच उपलब्ध करून द्यावे लागते.
जमिनीवर वाढणा-या वनस्पतींन मातीतील नैसर्गिक पर्यावरण, त्यातील सुक्ष्मजीव, जनावरांचे मलमुत्र आणि इतर आवश्यक घटकांचा पुरवठा नैसर्गिक रित्या होतो. कुंड्यामधील वनस्पतींना मात्र हा पुरवठा सातत्याने करावा लागतो आणि कुंड्यातील परिसंस्था सतत जीवंत ठेवावी लागते. यालाच आपण कुंड्यांची सूक्ष्म परिसंस्था म्हणूया.
या संपूर्ण चर्चेचा मतितार्ह हा की कुंड्यातील वनस्पतींच्या निकोप वाढी साठी आपणाला सुक्ष्म परिसंस्थेची निर्मिती आणि व्यवस्थापन करावे लागते आणि यातच कुंड्यातील वनस्पतीचे विज्ञान सामावले आहे. कुंडीती वनस्पतीला आनंदाने वाढण्यासाठी, फुलण्यासाठी आणि भरभरून फळे देण्यासाठी अशी परिसंस्था अधिकाधिक सुदृढ बनवण्यासाठी मातीविरहित कुंड्याचे तंत्र महत्वाची भूमिका बजावते.
(क्रमशः)
*मंदार वैद्य*
Comments
Post a Comment