मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ५
*मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ५*
*संजीवक कुंडी मिश्रणाचा पहिला घटक:कंपोस्ट*
कुंडी मिश्रणात घरच्या ओल्या कचऱ्या पासून बनवलेले कंपोस्ट सर्वोत्तम. आपल्या घरातील ओल्या कचऱ्यात भाजीचे देठ, फळांची सालं, अंड्याची आणि शेंगांची टरफलं असे विविध घटक असल्यास घरच्या कंपोस्ट मध्ये जवळजवळ सगळेच प्राथमिक आणि दुय्यम पोषक घटक येतात. चांगले तयार झालेले कंपोस्ट वनस्पतींना ताबडतोबीचे पोषण देते आणि वनस्पती जोमाने वाढतात. आणि कुंडीतील पोषण मूल्य झपाटयाने कमी होते. त्यामुळे वनस्पतीची वाढ कमी होते. आपल्या कुंडीतील वनस्पती किमान पुढील पाच ते सहा महिने आपल्याला उत्पादन देणार आहे हे लक्षात घेऊन कंपोस्ट बरोबरच इतर स्लो रिलीज घटक वापरणे तेवढेच महत्वाचे ठरते.
कंपोस्ट भुसभुशीत आणि जास्त सच्छिद्र असते, त्यामुळे मुळांना पुरेसा अँकरेंज पुरवण्यास कंपोस्ट असमर्थ असते आणि वनस्पती वारा व पावसामुळे एका दिशेला कलू लागतात. म्हणूनच कुंडी मिश्रणात मुळांना पुरेसा अँकरेंज मिळवून देणारे इतर सेंद्रिय घटक मिसळणे गरजेचे असते.
पुढील लेखांकात कुंडी मिश्रणासाठी दुसरा घटक शेणखत
*मंदार वैद्य*
*वरिल लेख हिरवा कोपरा ब्लाॅग वर पुर्वप्रकाशीत आहे*
Comments
Post a Comment