मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ७

संजीवक कुंडी मिश्रणात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडी
कुंड्यातील वनस्पतींच्या सुयोग्य वाढीसाठी कुंडीतील पोषण मूल्य जोपासण्यासाठी भरखतांचे वैविध्य राखण्यात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्व खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडीमध्ये NPK असतेच. नीम, एरंड आणि करंज पेंडीत जवळ जवळ सर्व दुय्यम अन्नद्रव्ये असतात आणि कुंडीतील मातीविरहित मिश्रण शत्रू सूक्ष्म जीवांपासून मुक्त राखण्यासाठीचे प्रतिकारक गुणही असतात.
खाद्य तेलबियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण असते आणि त्यातून वनस्पतींना सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात (आपल्याला जशी व्हिटॅमिन ची गरज असते तशीच वनस्पतींनाही असते) आपल्या कुंड्यातील वनस्पतींच्या आरोग्यदायी वाढी साठी म्हणूनच कुंडी मिश्रणात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडी वापरणे फायद्याचे असते.
जाता जाता आपण आपल्या कुंड्यांच्या तळाशी जर अर्धवट कुजलेला पाला पाचोळा वापरत असू तर असा पालापाचोळा कुजताना कुंडीतील नायट्रोजन शोषून घेतो आणि वनस्पतींची वाढ खुंटते. अशा परिस्थितीत सरकीची पेंड अतिरिक्त नायट्रोजनचे व्यवस्थापन करण्यास मदत करते

Comments
Post a Comment