मातीविरहित कुंड्या चे विज्ञान नॅनो लाखांक ८*

*मातीविरहित कुंड्या चे विज्ञान नॅनो लाखांक ८*

*कोकोपीट*
कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचा भूसा हे काॅयर इंडस्ट्रीमधून निघणारे बाय प्राॅडक्ट आहे. याचा विविध क्षेत्रात  उपयोग होतो.
*स्वत कोकोपीट आणि महाग कोकोपीट यातील फरक*
कोकोपीट मध्ये Electrical conductivity qualities (ECQ) असतात. ताज्या कोकोपीट मध्ये या ECQ अधिक असतात. High ECQ कोकोपीट ची विघटनशीलता कमी असते आणि इतर अॅसिडिक तत्वांबरोबर  त्याचा संयोग झाल्यावर वनस्पतींच्या वाढीसाठी हवातसा फायदा होत नाही. म्हणून याचा वापर नर्सरीत करत नाहीत. हे कोकोपीट शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी वापरतात. आणि खूपच स्वस्त असते.
High ECQ कोकोपीट जवळजवळ सहामहिने पावडर स्वरूपात साठवून ठेवून सतस त्याची आर्द्रता संभाळून Low ECQ कोकोपीट मध्ये रुपांतरीत केले जाते. Low ECQ कोकोपीट   थोडेसे काळपट दिसते आणि त्याचा वनस्पतींना खूपच चांगला उपयोग होतो. प्रक्रिया केलेले असल्यामुळे त्याच्या विटा बनवता येत नाहीत आणि ते पावडर स्वरूपातच विकले जाते. नर्सरीत मिळणारे हे कोकोपीट म्हणूनच महाग असते.
कोकोपीटची वीट विकत घेताना त्यावर High ECQ असे लिहिलेले असते. विकत घेतल्यावर एखाद्या ड्रम मध्ये ते मोकळे करावे आणि किमान सहा महिने आर्द्रता ठेवून थोडे काळपट पडल्यावर वापरावे. गोमुत्राची फवारणी केल्या प्रक्रिया गतीमान होते.
मंदार वैद्य
*हा लेख सम्यक ग्रीन च्या हिरवा कोपरा ब्लाॅग वर पुर्वप्रकाशीत आहे.*

Comments

Popular posts from this blog

‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?