Posts

Featured post

हिरवा कोपरा परिचय

घरातल्या छोट्याशा बाल्कनीत किंवा घराच्या परिसरात आपल्या हौसेचा हिरवा कोपरा अंकुर धरत असतो. आपण त्याला जिवापाड जपतो, तरीही कधीतरी तो रागावतो, मलूल, निराश होतो. हा कोपरा कायम प्रसन्न, टवटवीत राहावा यासाठी आनंदाची लागवड करणारी लेखमाला आपणा पुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. मागील काही वर्षात आम्ही आमच्या शेतावर तसेच आमच्या बाल्कनीत केलेल्या शहरी सेंद्रिय शेतीच्या प्रयोतून आणि मीटर मैत्रिणींशी चर्चा करताना जे उमगलं तेते वाचनीय स्वरूपात येथे मांडले आहे. यातील बहुंतांश लेख या आधी लोकमत सखींमध्ये हिरवा कोपरा सदरात प्रकाशित झाले आहेत आणि पुस्तक रूपातही उपलब्ध आहेत. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतील आणि टीकात्मक प्रतिक्रिया आम्हाला नव्याने विचार करायला प्रेरणा देतील हा आत्मविश्वास वाटतो. आपल्या सर्व प्रतिक्रिया निःसंकोच पणे नक्की  कळवाव्यात ही विनंती.. email mandarcv@samyakgreen.in  या निमित्ताने आमच्या अभिनव सामाजिक उद्योजकतेचा परिचयही करून देणे अगत्याचे ठरेल.    आरोग्यम धनसंपदा असे आपण मानतो. आपल्या कुटुंबाला पौष्टिक, सकस आहार मिळावा ...

मातीविरहित कुंड्या चे विज्ञान नॅनो लाखांक ८*

* मातीविरहित कुंड्या चे विज्ञान नॅनो लाखांक ८ * * कोकोपीट * कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचा भूसा हे काॅयर इंडस्ट्रीमधून निघणारे बाय प्राॅडक्ट आहे. याचा विविध क्षेत्...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ७

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान नॅनो लेखांक ७ संजीवक कुंडी मिश्रणात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडी  कुंड्यातील वनस्पतींच्या सुयोग्य वाढीसाठी कुंडीतील पोषण मूल्य जोपासण्यासाठी भरखतांचे वैविध्य राखण्यात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्व खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडीमध्ये NPK असतेच. नीम, एरंड आणि करंज पेंडीत जवळ जवळ सर्व दुय ्यम अन्नद्रव्ये असतात आणि कुंडीतील मातीविरहित मिश्रण शत्रू सूक्ष्म जीवांपासून मुक्त राखण्यासाठीचे प्रतिकारक गुणही असतात. खाद्य तेलबियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण असते आणि त्यातून वनस्पतींना सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात (आपल्याला जशी व्हिटॅमिन ची गरज असते तशीच वनस्पतींनाही असते) आपल्या कुंड्यातील वनस्पतींच्या आरोग्यदायी वाढी साठी म्हणूनच कुंडी मिश्रणात खाद्य आणि अखाद्य तेलबियांच्या पेंडी वापरणे फायद्याचे असते. जाता जाता आपण आपल्या कुंड्यांच्या तळाशी जर अर्धवट कुजलेला पाला पाचोळा वापरत असू तर असा पालापाचोळा कुजताना कुंडीतील नायट्रोजन शोषून घेतो आणि वनस्पतींची वाढ खुंटते. अशा परिस्थितीत सरकीची पेंड अतिरिक्त नायट्रोजनचे व्यवस्थापन क...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ६*

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ६* *संजीवक कुंडी मिश्रणाचा दुसरा घटक: शेणखत*  संजीवक कुंडी मिश्रणात घरी तयार केलेल्या कम्पोस्ट सोबत   सर्वात सहजपणे उपलब्ध होणारं आणि स्वस्त खत म्हणजे शेण खत. पूर्णत: कुजलेल्या शेणखतात नायट्रोजन, फॉेस्फरस आणि पोटयाश असतं.  पुर्णतःकुजलेले शेणखत काळे पिठाळ दिसते आणि कोरड्या स्वरूपात गंधहीन असते. पाण्याचा स्पर्श होताच शेणाचा आणि पहिल्या पावसानंतर मातीला येणा-या सुगंधा प्रमाणे सुगंध येतो.    शेणखताचे कण बारिक असल्याने  कुंडीतील वनस्पतींच्या मुळांना भक्कम आधार देण्यासाठी शेणखत महत्त्वाची भूमिका बजावते.  शेणखत शेतकर्‍याकडील उकीरड्यावरून आणलेलं असलं तरी त्यात प्लॅस्टिक तसेच इतर कचरा, खडे असण्याची शक्यता असते.  त्यामुळे ते छोट्या चाळणीतून चाळून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत ओलं शेणखत किंवा कृत्रिमरित्या कोरडे केलेले शेणखत  वापरू नये. ओलं शेणखत कुजताना उष्णता निर्माण करतं. तसंच ओल्या शेणात उनी (व्हाइट ग्रब) असते. कुंडीत उनी वाढल्यास वनस्पतींची नवीन मुळं खातात आणि वनस्पतींची वाढ खुरडत...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ५

*मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ५* *संजीवक कुंडी मिश्रणाचा पहिला घटक:कंपोस्ट*  कुंडी मिश्रणात घरच्या ओल्या कचऱ्या पासून बनवलेले कंपोस्ट सर्वोत्तम. आपल्या घरातील ओल्या कचऱ्यात भाजीचे देठ, फळांची सालं, अंड्याची आणि शेंगांची टरफलं असे विविध घटक असल्यास घरच्या कंपोस्ट मध्ये जवळजवळ सगळेच प्राथमिक आणि दुय्यम पोषक घटक येतात. चांगले तयार झालेले कंपोस्ट वनस्पतींना ताबडतोबीचे  पोषण देते आणि वनस्पती जोमाने वाढतात. आणि  कुंडीतील पोषण मूल्य झपाटयाने कमी होते.  त्यामुळे वनस्पतीची  वाढ  कमी होते. आपल्या कुंडीतील वनस्पती किमान पुढील पाच ते सहा महिने आपल्याला उत्पादन  देणार आहे हे लक्षात घेऊन कंपोस्ट बरोबरच इतर स्लो रिलीज घटक वापरणे तेवढेच महत्वाचे ठरते. कंपोस्ट भुसभुशीत आणि जास्त सच्छिद्र असते, त्यामुळे मुळांना पुरेसा अँकरेंज पुरवण्यास कंपोस्ट असमर्थ असते आणि वनस्पती वारा व पावसामुळे एका दिशेला कलू लागतात. म्हणूनच कुंडी मिश्रणात  मुळांना पुरेसा अँकरेंज मिळवून देणारे इतर सेंद्रिय घटक मिसळणे गरजेचे असते.  पुढील लेखांकात कुंडी मिश्रणासा...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ४

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ४ कुंड्यातील वनस्पतींना  परिपूर्ण चौरस अहाराचे संजीवक कुंडी मिश्रण आपल्या स्वयंपाक घरात तयार होणा-या प्रत्येक पदार्थासाठी आपल्याला वेगवेगळे साहित्य जमा करावे लागते. उदाहरणा दाखल काकडीची कोशिंबीर घेऊयात त्यासाठी काकडी, दही, दाण्याचा कुट, मोहरी, हळद, तेल, मीठ, साखर असे साहित्य लागते त्याच प्रमाणे वनस्पतीच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळया संजीवक मिश्रणाचे प्रकार (रेसीपी) तयार करावे लागतात.  या लेखांकात आपण संजीवक कुंडी मिश्रणासाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची ओळख करून घेऊया. सर्व वनस्पतींना नायट्रोजन, पोटयॅशियम आणि फॉस्फरस या प्राथमिक अन्नद्रव्यांची गरज असते हे आपण सर्वच जण जाणतो. बहुतांश कंपोस्ट खतं याची गरज पूर्ण करतात.  या शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि  सल्फर ही द्वितीय अन्नद्रव्यंही वनस्पतींच्या आरोग्यदायी वाढीसाठी गरजेची असतात. याशिवाय इतर आठ सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही वनस्पतींना अत्यल्प प्रमाणात गरज असते.  सर्व प्रकारची अन्नद्रव्यं वनस्पतींना उपलब्ध व्हावीत म्हणून कोणत्याही एकाच प्रकारच्या सेंद्रिय खत...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ३

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक ३ कुंडीतील वनस्पती विज्ञानाचे तत्व कुंड्यातील वनस्पतींच्या सुयोग्य वाढीसाठी ज्या प्रमाणे कुंडीच्या बाहेरील पर्याव...

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक २

मातीविरहित कुंड्यांचे विज्ञान  नॅनो लेखांक २ कुंडीतील वनस्पती विज्ञान (container gardening) बागेती जमीनीवर, शेतात, जंगलात  वाढणा-या वनस्पती आंणि कुंड्या मध्ये वाढणा-या वनस्पती यांच...